रस यूष सार रसम इतके सुंदर शब्द आपल्या शब्दकोशात असताना आपण मात्र मूळचा फ्रेंच असलेला सूप हाच शब्द आजही वापरत आहोत
का ते ठाऊक नाही
कोणत्याही पदार्थाचे सार काढणे हि पद्धत इजिप्त आणि भारत वर्षात अस्तित्वात आली असे इतिहास सांगतो आणि नंतरच ती जगभरात पसरली
याचइतिहासाला स्मरून आज आपण बनवणार आहोत एक असा सार जो थंडीच्या दिवसात खास करून बनवला जातो
पालकांचे सूप

पालकांचे सूप बनवण्यासाठी आप्ल्यालाल लागेल
१ वाटी पालक, १ इंच आल्याचा तुकडा, ५ te लसणाच्या पाकळ्या, ५ ते ६ काळीमिरी, १ कांदा ,
१/2 वाटी नारळाचे दूध, आणि चवी पुरात मीठ
सर्व प्रथम पालकची पाने स्वच धुऊन घ्या
मग कुकर मध्ये धुतलेली पालकची पाने , आल्याचा तुकडा , ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि काळीमिरी घाला
व वरून १ पेला भर पाणी घाला व ३ शिट्ट्या करून शिजवून घ्या
कुकर उघडा व शिजवलेले मिश्रण मिक्सर च्या भांड्यात घाला व याची पेस्ट तयार करून घ्या
तयार पेस्ट पातेल्यात काढू घ्या व याची एक उकळ काढा
वरून यात नारळाचे दूध व चवी पुरत मीठ घाला
गरज वाटल्यास तुम्ही यात पाणी हि वाढवू शकता
तयार झालं पालकांचे सूप
हे पालकांचे सूप सर्वे करताना यात २ चमचे दूध किंवा क्रीम किंवा cheese किसुन घालू शकता याने सूप ची चव आणखीन वाढते
https://www.facebook.com/beingmarathi?ref=hl

https://twitter.com/beeingfilmy

https://plus.google.com/b/102604561801583424476/102604561801583424476/posts

https://www.linkedin.com/home?trk=nav_responsive_tab_home

http://www.pinterest.com/aaryainternatio/pins/

https://www.tumblr.com/blog/beeingfilmy

source